चाट साठी वेगवेगळ्या चटण्या | लाल मिरची आणि लसूण चटणी | कोथिंबीर आणि पुदिना चटणी | खजूर आणि चिंच गुळाची चटणी

चाट साठी वेगवेगळ्या चटण्या
सायंकाळच्या नाश्ता साठी प्रसिध्य असलेल्या आणि रोड साइडला, स्टेशन बाहेरचे स्टॉल,  खावू गल्ली मध्ये फेमस असणारी पाणी पुरी, शेव पुरी, दही पुरी, रगडा पॅटीस आणि इतर चाट रेसिपी साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या चटण्या बनवण्याची पद्धत सांगितली आहे.


चटणी बनवण्यासाठी १ तास अगोदर चिंच, खजुर आणि लाल मिरच्या ( बिया काढून ) पाण्यात भिजत ठेवा.


१) कोथिंबीर पुदिना चटणी ( हिरवी चटणी )
साहित्य :-
१ वाटी कोथिंबीर
अर्धा वाटी पुदिना
२-३ हिरव्या मिरच्या
१ चमचा भाजकी चणाडाळ
४ लसूण पाकळ्या
अर्धा इंच आल
१ चमचा लिंबू रस
सैधव मीठ ( चवीनुसार )
तेल
पाणी

कृती :-
१) वरील दिलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि बारीक वाटून घ्यावे.
२) कोथिंबीर आणि पुदिना चटणी तयार आहे.


२) मिरची आणि लसूण चटणी ( लाल चटणी )
साहित्य :-
८-१० लाल मिरच्या
८-१० लसूण पाकळ्या
अर्धा इंच आल
१ चमचा लिंबू रस
१ चमचा जिरे पावडर
सैधव मीठ
तेल
पाणी


कृती :-

१) वरील दिलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि बारीक वाटून घ्यावे.
२) लाल मिरची आणि लसूण चटणी तयार आहे.


३) खजूर आणि चिंच गुळाची चटणी
साहित्य :-
१०० ग्रॅम खजुर
५० ग्रॅम चिंच
५० ग्रॅम गुळ
१ चमचा लाल तिखट
१ चमचा जिरे पावडर
सैधव मीठ
पाणी

कृती :-
१) बिया काढून भिजत ठेवलेले खजुर आणि चिंच कुकर मध्ये घ्या त्यामध्ये १ लहान चमचा लाल तिखट, जिरे पावडर, सैधव मीठ ( चवीनुसार ) घालून २ शिट्या काढून घ्या.
२) मिश्रण थंड करून घ्या आणि मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक वाटून घ्या.
३) एक भांडे घ्या त्यावर चाळण ठेवा त्यावर मिक्सर मधले मिश्रण ओता आणि चांगले ढवळून घ्या.
४) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा त्यात खजुर चिंच चे मिश्रण ओता त्याच बरोबर गुळ घालून मिश्रण ५ मिनिटे उकळून घ्या.
५) चटणी थंड करून घ्या.
६) खजुर आणि चिंच गुळाची आंबट गोड चटणी तयार आहे.


Different chutneys for chat recipes

Soak the tamarind, dates and red chillies (remove seeds) in water 1 hour before making chutney.

1) Coriander Mint Chutney (Green Chutney)
Ingredients : -
1 cup Coriander leaves 
Half a cup of mint leaves
2-3 green chillies
1 tbsp Bhajki Chanadal ( split chickpeas lentils )
4 garlic cloves
Half an inch ginger
1 tablespoon lemon juice
Saidhav salt (to taste)
Oil
Water

Method : -
1) Take the above ingredients in a mixer bowl and grind finely.
2) Coriander and mint chutney is ready.


2) Chili and Garlic Chutney (Red Chutney)
Ingredients : -
8-10 red chillies
8-10 garlic cloves
Half an inch ginger
1 tablespoon lemon juice
1 tablespoon cumin powder
Saidhav salt
Oil
Water

Method : -
1) Take the above ingredients in a mixer bowl and grind finely.
2) Red Chili and Garlic Chutney is ready.


3) Date and Tamarind Jaggery Chutney
Ingredients : -
100 gms of dates
50 gms tamarind
50 grams jaggery
1 tablespoon red chili powder
1 tablespoon cumin powder
Saidhav salt
Water

Method : -
1) Remove seeds and take soaked dates and tamarind in a cooker.
2) Cool the mixture and remove it in a mixer pot.
3) Take a pot, put a sieve on it, pour the mixture in it and mix well.
4) Turn on the heat and keep the kadai hot. Pour the date tamarind mixture in it, add jaggery and boil the mixture for 5 minutes.
5) Cool the chutney.
6) Sour sweet chutney of date and tamarind jaggery is ready.
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने