ना भाजणी, ना तेलाचे मोहन मैद्याच्या खुसखुशीत चकल्या अचूक मापामध्ये अश्याप्रकारे बनवा

ना भाजणी, ना उकड, ना तेलाचे मोहन  २ किलो मैद्याच्या खुसखुशीत चकल्या अचूक मापामध्ये कश्या पद्धतीने बनवायच्या ते नक्की पहा | maidyachya chakalya | मैद्याच्या चकल्या

मैद्याची चकली

दिवाळी चकली शिवाय अपूर्ण वाटते. दिवाळी मध्ये चकली खाण्याची मज्जाच वेगळी असते, दिवाळी फराळाचे ताठ चकली शिवाय अपूर्ण दिसते. चकलीची भाजणी, चकली साठी उकड, चकली साठी मोहन अश्या कोणत्याच गोष्टीचा विचार न करता बिनधास्त मैद्याच्या खुसखुशीत चकल्या बनवा.

मैद्याच्या चकल्या नक्की बनवून बघा आणि  कश्या झाल्या ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ ला लाईक करा फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेल वर व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला नोटीफिकेशन मिळेल. 
साहित्य :-
२ किलो मैदा
३ पाकीट राम बंधू चकली मसाला ( ५० ग्रॅम प्रत्येकी )
१०० ग्रॅम लाल मिरची पावडर
५० ग्रॅम ओवा
१०० ग्रॅम सफेद तीळ
१ कॉटन कापड
चकली साचा
मीठ ( चवीनुसार )कृती :-
१) मैदा चाळून घ्या.
२) एक कॉटन कापड घ्या त्यावर चाळून घेतलेला मैदा घ्या आणि कॉटन कापड व्यवस्थित बांधून घ्या. ( त्यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.)
३) कूकर घ्या त्यामध्ये जाळी ठेवा पाणी ओता आणि त्यावर कूकर चा डब्बा ठेवा. ( डब्बा मध्ये वरण किंवा भात लावू शकता किंवा रिकामा डब्बा ठेवलात तरी चालेल)
४) कूकरला ३ शिट्ट्या काढून घ्या.
५) कूकर थंड झाल्यावर त्यातून मैद्या बांधलेला कॉटन कापड बाहेर काढा.
६) बांधलेला कॉटन कापड सोडून त्यामधले पिठ फोडून घ्या. ( लाठणी किंवा वरवंटा च्या साहाय्याने )
७) परात घ्या त्यामध्ये पिठ चालायची चाळण घ्या. चाळणीच्या साहाय्याने फोडून घेतलेले पिठ चाळून घ्या.
८) चाललेल्या पीठ मध्ये लाल मिरची पावडर, तीळ,ओवा, मीठ राम बंधू चकली मसाला घालून पीठ एकजीव करून घ्या.
९)  एकजीव पीठ मध्ये साध्या पाण्याचा वापर करून पिठ मळून घ्या. ( भाकरी किंवा चपाती साठी जसे पिठ मळतो तसे )
१०) मळलेले पिठ १ तास झाकून मुरत ठेवा.
११) १ तासानंतर चकली साच्याचा वापर करून व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे चकल्या बनवून घ्या.
१२) गॅस चालू करा आणि कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात चकल्या सोडा. अध्याप्रकारे सगळया चकल्या तळून घ्या.
१३) दिवाळी साठी मैद्याच्या खुसखुशीत चकल्या तयार आहेत.
चकल्या हवाबंद डब्यांत ठेवून संपेपर्यंत मस्तपैकी आस्वाद
घेयाचा.

Maidyachi Chakli

Diwali feels incomplete without Chakli.  The taste of eating chakli is different in Diwali, Diwali farala looks incomplete without stiff chakli.  Make crispy chaklas without any worries like chakli bhajani, ukad for chakli, mohan for chakli.

Try making the maidyachi chakali and tell me exactly how it happened in the comments.
Like the video and share it with your friends and family.  Don't forget to subscribe. Click on the bell icon and you will be notified as soon as the video is uploaded to our channel.

Ingredients : -
2 kg flour ( maida )
3 packets of Ram Bandhu Chakli Masala (50 gm each)
100 gms red chilli powder
50 grams of ova
100 gm white sesame seeds
1 cotton cloth
Chakali sacha
Salt (to taste)

Method : -
1) Sift flour.
2) Take a cotton cloth, take sifted flour on it and tie a cotton cloth properly.  (Make sure no water gets into it.)
3) Take a cooker, put a net in it, pour water and place a cooker box on it.  (You can put Varan or rice in the cooker dabba or you can keep the cooker dabba empty)
4) Remove 3 whistles from the cooker.
5) When the cooker cools down, take out a cotton cloth tied with flour.
6) Leave the tied cotton cloth and break the flour in it.  (With the help of lathani or varvanta)
7) Take a sieve and sift the flour in it.  Sift the flour through a sieve.
8) Add red chilli powder, sesame seeds, ova, salt, Ram Bandhu Chakli Masala and mix well.
9) Knead the dough using plain water.  (Like flour for bhakari or chapati)
10) Cover the flour and keep it for 1 hour.
11) After 1 hour, make chakalis as shown in the video using chakli mold.
12) Turn on the heat and keep the pan hot.  Once the pan is hot, add oil.  Once the oil is hot, leave the chakali in it.  Fry all the chakali as usual.
13) Crispy chakali of Maidya are ready for Diwali. Taste the chakali till it is finished by keeping it in airtight containers.

 Tags :- 
मैदा चकली, मैद्याची चकली, homemade, marathi, kitchen, youtuber, delicious, maida, special,
Sanjeev Kapoor, Maharashtrian recipe, MadhurasRecipe, भाजणी चकली, NishaMadhulika, खुसखुशीत चकली, दिवाळी, Diwali, चवीष्ट चकली, maidyachi chakali, maida chakali 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने