Restaurants style mashroom pav bhaji | मशरूम पाव भाजी


पावभाजी ही मुंबईतील एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड डिश आहे. हे संपूर्ण भारतभरात देखील लोकप्रिय आहे कारण त्याची आवड स्वर्गाप्रमाणे आहे आणि बनवणे सोपे आहे. आमच्या घरातील सर्वांना पाव भाजी आवडतात. मला ते शिजवण्याचा आनंद आहे आणि एक सोपी, चवदार रेसिपी विकसित केली आहे. चला पाव भाजी बनवायला शिकू या.मराठी

साहित्य :-
पाव लादी
१ पॅकेट मशरूम
१ बटाटा
१ वाटी कोबी
१ वाटी फ्लॉवर
१ शिमला मिरची
१ गाजर
१ बीट
२ टोमॅटो
१ बारीक चिरलेला कांदा
२ चमचे पाव भाजी मसाला
१ चमचा गरम मसाला
२ चमचे एव्हरेस्ट लाल तिखट मसाला
मीठ ( चवीनुसार )
कोथिंबीर
कसुरी मेथी
लिंबू
अमूल बटर
तेल 


कृती :-
१) सगळया भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि चिरून घ्या.
२) मशरूम साफ करून घ्या.
३) कुकर घ्या त्यामध्ये बटाटा, कोबी, फ्लॉवर, शिमला मिरची, गाजर, बीट, टोमॅटो, मीठ, पाव भाजी मसाला टाकून ४-५  शिट्या काढून घ्या.
४) कुकर मधली शिजवलेली भाजी थंड करून घ्या. थंड झालेली भाजी मिक्सर मधून वाटून घ्या.
४) गॅस चालू करा आणि त्यावर तवा गरम करायला ठेवा, तवा गरम झाल्यावर त्यात बटर आणि तेल सम प्रमाणात घाला.
त्यात साफ केलेले मशरूम घाला वरून मीठ आणि हळद घाला. आणि १० मिनिटे शिजवून घ्या.
५) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा, कढई गरम झाल्यावर त्यात बटर आणि तेल सम प्रमाणात घाला मग त्यात बारीक चिरलेला कांदा, आल - लसूण पेस्ट घालून २ मिनिटे चांगले परतून घ्या.
६) २ मिनिटांनी त्यात हळद, गरम मसाला, एव्हरेस्ट लाल तिखट मसाला घाला आणि मसाले एकजीव करून घ्या.
७) मग त्यात मिक्सर मधून बारीक करून घेतलेली भाजी आणि कूकर मध्ये राहिलेले पाणी घालून भाजी एकजीव करून घ्यावे.
८) कढई वर झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजी १० मिनिटे शिजवून घ्यावे जेणेकरून भाजी आणि मसाला चांगला एकजीव होईल.
९) १० मिनिटानंतर त्यात कोथिंबीर, कसुरी मेथी, मीठ चवीनुसार घालावे. थोडे बटर घालावे.
१०) पाव भाजीची भाजी तयार आहे.
११) पाव तयार करण्यासाठी :- गॅस चालू करा आणि त्यावर तवा ठेवा त्यात थोड बटर, हळद, एव्हरेस्ट लाल तिखट मसाला, पाव भाजी ची भाजी टाका आणि २ मिनिटे परतून एकजीव करून घ्यावे आणि त्यात पाव दोन्ही बाजूने भाजून घ्या.
१२) मशरूम पाव भाजी तयार आहे.


ENGLISH:

Ingredients : -
Pav Ladi
1 packet Mushroom
1 potato
1 cup cabbage
1 cup cauliflower
1 capsicum
1 carrot
1 beetroot
2 tomatoes
1 finely chopped onion
2 tbsp Pav Bhaji Masala
1 tbsp garam masala
2 tbsp Everest Red Chili Masala
Salt (to taste)
Coriander leaves
Kasuri methi
Lemon
Amul Butter
Oil


Method : -
1) Wash all vegetables with clean water and chop.
2) Clean the mushrooms.
3) Take a cooker, add potato, cabbage, cauliflower, capsicum, carrot, beetroot, tomato, salt, pav bhaji masala and remove 4-5 whistles.
4) Cool cooked vegetables in a cooker.   Grinding the cooled vegetables in a mixer.
4) Turn on the heat and keep the pan hot. Once the pan is hot, add butter and oil in equal proportions. Add cleaned mushrooms, salt and turmeric.  And cook for 10 minutes.
5) Turn on the heat and keep the kadai hot on it. Once the kadai is hot, add butter and oil in equal proportions, then add finely chopped onion, ginger- garlic paste and saute for 2 minutes.
6) After 2 minutes add turmeric powder, garam masala, Everest red chili masala and mix the spices well.
7) Then add chopped vegetables from the mixer and water left in the cooker.
8) Cover the pan and cook over medium heat for 10 minutes so that the vegetables and spices mix well.
9) After 10 minutes add coriander leaves, kasuri methi, salt to taste.  Add a little butter.
10) To make Pav: - Turn on the heat and put a frying pan on it. Add a little butter, turmeric powder, Everest red chili masala, Pav bhaji and fry for 2 minutes.
12) Mushroom pav bhaji is ready. 

Tags:
Mushroom Pav Bhaji, Mushroom recipes, pav bhaji, mushroom, मशरूम पाव भाजी, पाव भाजी रेसिपी, पावभाजी रेसिपी, Mashroom Pavbhaji, Mashroom Pav Bhaji, Mumbai Famous Pav Bhaji, Mushroom Paneer Pav Bhaji, Mushroom Paneer Pav Bhaji With Desi Style, hindi me sikhiye mushroom ki sabji kaise banaye, mushroom masala, mushroom masala with cheese, मुंबई स्ट्रीट फुड, Breakfast, Lunch, Beverages, indian food, kids lunch box recipes, easy lunch recipes


Video:
How to Clean Mushroom | Clean Mashroom | मशरूम स्वच्छ कसे करायचे | मशरूम कैसे साफ करे
Post a Comment

थोडे नवीन जरा जुने