वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी | भगर भात | upwas special | दाण्याची आमटी नि भात

वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी

कोणत्याही उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी. बनवायला खूपच सोपा आणि चवीला खूपच स्वादिष्ट लागणारा हा पदार्थ उपवासाच्या दिवशी नक्की बनवा. नवरात्री,  एकादशी  किंवा कोणत्याही उपवासाच्या दिवशी बनवा. साहित्य:-
वरीचा भात
१ वाटी वरीचे तांदूळ / भगर
२ वाटी गरम पाणी
१ चमचा जिरे
२ चमचे तूप
१ चमचा साखर
मीठ ( चवीनुसार)शेंगदाण्याची आमटी :-
१ वाटी शेंगदाणे
अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे
४ हिरव्या मिरच्या
१ चमचा साखर
२ चमचे तूप
१ चमचा जिरे
४-५ कढीपत्ता
पाणी
मीठ ( चवीनुसार )कृती :-

भगर/ वरीचा भात बनवण्यासाठी :-
१) वरीचा भात बनवण्यासाठी पाणी गरम करून घ्या.
२) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तूप घाला.
३) तूप गरम झाल्यावर त्यात जिरे घाला आणि वरीचे तांदूळ घाला आणि २ मिनिटे परतून घ्या.
४) मग त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घाला वरून गरम पाणी घालून ५ मिनिटे शिजवून घ्या.
५) ५ मिनिटानंतर गॅस बारीक करा आणि कढई वर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफवून घ्या.
६) ५ मिनिटानंतर वरीचा भात तयार आहे.

शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी:-
१) पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्या.
२) शेंगदाणे थोडे थंड झाल्यावर त्यांना हातावर चोळून त्याची टरफले काढून घ्या.
३) त्या मधले अर्धे शेंगदाणे मिक्सरला बारीक वाटा आणि शेंगदाण्याचे कूट वाटीत काढून घ्या.
४) त्याच मिक्सरच्या भांड्यात राहिलेले अर्धे शेंगदाणे, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, हिरवी मिरची ची बारीक पेस्ट करून घ्या.
५) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता, जिरे घाला आणि मिक्सरला वाटून घेतलेले वाटण घाला आणि २ मिनिटे परतून घ्या.
६) मग त्यात चवीनुसार साखर आणि मीठ टाकून परतून घ्या त्याच बरोबर पाणी घालून ५ मिनिटे उकळून घ्या.
७) ५ मिनिटानंतर शेंगदाण्याचे कूट घालून ५ मिनिटे उकळून घ्या.
८) शेंगदाण्याची आमटी तयार आहे.


Samo rice and peanut aamati :-

The most popular food on any fasting day is Vari rice and peanut aamati.  This dish is very easy to make and tastes as well.  Make sure to make it on Navratri, Ekadashi or any fasting day.

Ingredients : -
Samo rice / bhagar / varicha bhat
1 cup samo rice / Bhagar
2 cups hot water
1 tablespoon cumin seeds
2 tablespoons ghee
1 teaspoon sugar
Salt (to taste)

Peanut Aamti: -
1 cup peanuts
Half a cup of fresh coconut pieces
4 green chillies
1 teaspoon sugar
2 tablespoons ghee
1 tablespoon cumin seeds
4-5 curry leaves
Water
Salt (to taste)

Method : -

To make samo rice / bhagar : -
1) Heat water to make rice.
2) Turn on the heat and keep the pan hot.  Once the pan is hot, add ghee.
3) Once ghee is hot, add cumin seeds, rice and saut for 2 minutes.
4) Then add sugar and salt to taste, add hot water and cook for 5 minutes.
5) After 5 minutes, keep on a low flame the heat and cover the pan and cook for 5 minutes.
6) After 5 minutes, the samo rice / bhagar is ready.

To make Peanut Amti: -
1) Roast peanuts first.
2) Once the peanuts cool down, rub them on your hands and remove the shells.
3) Add half of the peanuts to the mixer and grind it well. Remove the peanuts powder in a bowl.
4) In the same mixer, make a fine paste of half of the remaining peanuts, fresh coconut pieces and green chillies.
5) Turn on the heat and keep the pan hot.  When the pan is hot, add ghee.  Once the ghee is hot, add curry leaves, cumin seeds, grinded mixture and saute for 2 minutes.
6) Add sugar and salt to taste and saute well. Add water and boil for 5 minutes.
7) After 5 minutes add peanut Powder and boil for 5 minutes.
8) Peanut aamati is ready.


Tags:
varicha bhat recipe, varicha bhaat recipe, vari tandool, shengdana amti recipe in marathi, shengdana amti, shengdanyachi amti, maharashtrian aamti recipe, recipes by archana, recipes in marathi, maharashtrian recipes, authentic, traditional, peanut curry recipe indian, fasting recipes, upvas special, navratri special upvas recipes, breakfast recipes for upvas, easy to make, upvas recipes, quick upvas recipes, ruchkar mejwani, marathi food channel, upvas recipes in marathi, Upvas Special, Varicha Bhaat & Shengdana Amti, Varai Bhat, Varai Khichadi Recipe In Marathi, वरईचा भात आणि शेंगदाना आमटी, Bahgar Recipe, Navratri Farali Recipes, भगर आणि शेंगदाणा आमटी, एकादशी विशेष भगर आणि शेंगदाण्याची आमटी रेसिपी, Ekadashi Special Bhagar Recipe, वरीचा भात, Bhagar, वरईचा भात रेसिपी मराठी मध्ये, bhagar recipe in marathi, Fasting Recipe, shengdanyachi aamti recipe, shengdana aamti in marathi, shengdanyachi amti in hindi

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने