Jhajhanit katvada | झणझणीत कट वडा | KatWada Recipe | Spicy Katwada | Kolhapuri katvada

Jhajhanit katvada | झणझणीत कट वडा | KatWada Recipe | Spicy Katwada | Kolhapuri katvada


ENGLISH
Steps: -
1) Make the first cut
2) Prepare the cover of vada
3) Make potato vegetable
4) Fry potatoes
5) Serve

Ingredients: -To make the kat: -
1 vertical chopped onion
Bowl of dried coconut
8-10 garlic cloves
1 piece of ginger
1 tomato
Oil
1 tablespoon mustard seeds
1 tablespoon cumin seeds
Salt (to taste)
Coriander leaves

To make Batada Vada Batter: -
2 cups gram flour
a pinch banking soda
Salt (to taste)
1 tablespoon turmeric
a pinch of asafoetida

To make Potato Vada: -
5 boiled potatoes
1 tablespoon mustard seeds
1 tablespoon cumin seeds
5 green chillies
1 piece of ginger
8-10 garlic cloves
Curry leaves
Asafoetida
Salt (to taste)
Coriander leaves

Method: - (While making the kat)
1) First to make masala for the kat, turn on the gas and heat up pan or kadhai. After heating the tawa or kadhai, fry onion, coconut, garlic and ginger in it.  Take this masala in a mixer bowl and make a fine paste.
And another mixer jar Add 5-6 Chilies, 8-10 Garlic Cloves, 1 Ginger Grind in a Mixer this paste will uesd while making the patato sabji
2) Turn on the heat and keep the kadai heated. When the kadai is heated, add oil. When the oil is heated, add mustard seeds, cumin seeds and masala also.
3) Fry the masala for 2-3 minutes till the oil evaporates.
4) Once masala is fried, add hot water.  Adding hot water gives your spice a nice kat.
5) Then add salt and coriander leaves.
6) and boil for 15-20 minutes.
7) Now your kat is ready.
8) Now we are going to make batter for Wadya.

Method: - (While making batter)
1) Take 2 cups gram flour.  Add salt (to taste).
2) Then add a pinch of baking soda, turmeric powder and ova
3) Add a little water and mix well.
(Do not keep the batter too thick or too thin.)
4) Your batter is ready.

Recipe: - (while making potato bhaji)
1) Boil 5 potatoes.
2) Turn on the gas.  Heat the kadai. Once the kadai is hot, add mustard seeds.
3) Turn off the gas.  Then add turmeric, stir the mixture and add potatoes.
4) Finely chop the potatoes with a masher and add cilantro and salt.
5) Your vegetable is ready as expected.  When the vegetables are cool, make their wada.
6) Your father is ready.  Now we are going to prepare Wade frying.

Method: - (for frying vada)
1) Turn on the heat and keep the pan hot.
2) Once kadai is hot, add oil.  Once the oil is hot, add the vada you have prepared in kadhai, fry the vada well on both sides.
3) Once your vada is well cooked, take it out in the dish
In this way your spicy kat Vada is ready.
Put vada in a dish, then add hot kat, then add finely chopped onion, coriander leaves and vada is ready to serve.


मराठी मध्ये:-
कट वडा

स्टेप्स:-
१) पहिला कट बनवायचा
२) वड्या च्या अवरणाची तयारी करायची
३) बटाटा ची भाजी बनवायची
४) बटाटे तळून घेणे
५) सर्व्ह करणे

साहित्य:- 

कट बनवण्यासाठी:-
१ उभा चिरलेला कांदा
पाव वाटी सुके खोबरे
८-१० लसूण पाकळ्या
१ आल्याचा तुकडा
१ टोमॅटो
तेल
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
मीठ (चवीनुसार)
कोथंबीर

बटाटा वडा बॅटर बनवण्यासाठी:-
२ वाटी बेसन
चिमूटभर खायचा सोडा
मीठ ( चवीनुसार)
१ चमचा हळद
चिमूटभर ओवा

बटाटा वडा बनवण्यासाठी:-
५ उकडलेले बटाटे
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
५ हिरव्या मिरची
१ आल्याचा तुकडा
८-१० लसूण पाकळ्या
कढीपत्ता
हिंग
मीठ ( चवीनुसार)
कोथींबीर

कृती :- ( कट बनवताना )
१) पहिल्यांदा कट साठी मसाला बनवून घ्यायचा त्यासाठी गॅस चालू करा आणि तवा किंवा कढई तापायला ठेवा, तवा किंवा कढई तापल्यावर त्यात कांदा खोबर लसूण आले भाजून घ्या.   मिक्सर भांड्यात हा मसाला घेवून बारीक पेस्ट करा.
त्याचा सोबत ५-६ मिरच्या, ८-१० लसूण पाकळ्या, १ आल्याचा तुकडा मिक्सर मध्ये बारीक करून घ्या
२) गॅस चालू करा आणि कढई तापायला ठेवा, कढई तापल्यावर त्यात तेल टाका, तेल तापल्यावर त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे टाका, मग त्यात मिक्सर मध्ये वाटलेले वाटण घाला.
३) वाटण २-३ मिनिटे मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्या.
४) मसाला फ्राय झाल्यावर त्यात गरम पाणी टाका. गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या मसाल्याला छान कट येतो.
५) मग मीठ आणि कोथिंबीर घाला.
६) आणि १५-२० मिनिटे उकळून घ्या.
७) आता आपला कट तयार आहे .
८) आता आपण वड्यासाठी लागणारे बॅटर बनवणार आहोत.

कृती :- ( बॅटर बनवताना )
१) २ वाटी बेसन पिठ घ्या. त्यात मीठ ( चवीनुसार) घाला.
२) मग त्यात चिमूटभर खायचा सोडा, हळद, ओवा हातावर चोळून टाका.
३) थोडे थोडे पाणी घालून बॅटर छान एकजीव करून घ्या.
(बॅटर सैलसर ठेवायचे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचे नाही.)
४) आपले बॅटर तयार आहे. आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत.

कृती:- ( बटाटा भाजी बनवताना)
१) ५ बटाटे उकडून घ्यावेत.
२) गॅस चालू करा. कढई गरम करायला ठेवा.कढई गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता टाका मग आल, लसूण, मिरची ची पेस्ट टाका आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे.
३) गॅस बंद करा. मग त्यात हळद टाका मिश्रण ढवळून घ्या आणि त्यात बटाटे टाका .
४) बटाटे मॉशर ने बारीक करून घ्या आणि त्यात कोथंबीर आणि मीठ घालुन नीट एकजीव करुन घ्या.
५) आश्या प्रकारे आपली भाजी तयार आहे . भाजी थंड झाल्यावर त्याचे वडे बनवून घ्या.
६) आपले वडे तयार आहेत. आता आपण वडे तळायची तयारी करणार आहोत.

कृती:- ( वडे तळण्यासाठी)
१) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा.
२) कढई गरम झाल्यावर त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात आपण तयार केलेले वडा टाका आणि दोन्ही बाजूने चांगला खरपूस भाजून घ्या.
३) आपला वडा चांगला भाजल्यावर त्याला डिश मध्ये काढून घ्या.
अश्याप्रकारे  आपला झणझणीत कट वडा तयार आहे .
एका डिश मध्ये वडा ठेवा त्यावर कट टाका त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि शेव टाकून खायला घ्या.

Tag:

झणझणीत कट वडा, how to make kat wada, kat vada, katwada recipe, katvada recipe, कोल्हापुरी झणझणीत कटवडा, कटवडा कसा बनवायचा, marathi video recipe, aloo vada, aloo vada banane ka tarika, home made katwada, katvada, kat wada, spicy vada recipe, vada recipe in marathi, maharashtrian recipes, कट वडा, rassa vada, cut vada recipe in marathi, vada rassa recipe in marathi, famous maharashtra recipe, jhanjhanit katvada, jhanjhanit kat wada

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने