Kanda Khobra Vatan | Watan Recipe | Onion Coconut Masala | कांदा आणि खोबऱ्याचे वाटण | Veg-NonVeg Kanda Khobra Vatan | Vatan Recipe


Kanda Khobra Vatan | Watan Recipe | Onion Coconut Masala | कांदा आणि खोबऱ्याचे वाटण | Veg-NonVeg Kanda Khobra Vatan | Vatan Recipe


ENGLISH

This is a vatan that doubles the taste of any cereal vegetable.  You can use this share for veg as well as non veg.  And most importantly, you can store this vatan in the fridge for 10-15 days, so it will be useful for you to keep it in the fridge in a hurry.

Ingredients: -


2 medium size bowls of coconut
6 medium sized onions
3 cloves of garlic
1 piece of medium size ginger
2 tablespoons sesame seeds
2 teaspoons salt

Method: -
1) Grate coconut.
2) Chop onions vertically.
3) Peel a clove of garlic.
4) Wash Ginger with clean water and wipe with a clean handkerchief then cut it into pieces.
5) Turn on the heat and keep the kadai hot on it. Once the kadai is hot, add sesame seeds and fry well.
6) When sesame seeds are roasted, remove from the pan and add coconut in the same pan and fry it well.
7) After roasting coconut, add garlic and ginger pieces and fry well.
8) After roasting garlic and ginger pieces, add onion and fry onion well.
9) Cool roasted sesame seeds, coconut, garlic, ginger and onion.
10) After cooling, divide the mixture one by one.
In a mixer, grind sesame seeds, then coconut, then garlic and Ginger, and finally onion.
11) When all the ingredients are divided, take a bowl and mix all the ingredients together and add salt.
12) Mix all the ingredients together and store in airtight containers.
13) You can use this distribution for veg as well as non veg.
14) In this way our vatan is ready.

मराठीमध्ये:-
कांदा खोबऱ्याचा टिकावू वाटण ,

कोणत्याही कडधान्याच्या भाजीची चव डबल झणझणीत करणारे हे वाटण आहे. हे वाटण तुम्ही व्हेज तसेच नॉनव्हेज साठी पण वापरू शकता.   आणि सगळ्यात महत्वाचे की हा मसाला तूम्ही १०-१५ दिवस फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्यामुळे घाईगडबडी च्या वेळेत तुम्हाला फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवलेले वाटण उपयुक्त ठरणार आहे.

साहित्य :-
२ मध्यम आकाराच्या खोबऱ्याच्या वाट्या
६ मध्यम आकाराचे कांदे
३ लसूण गड्डे
१ मध्यम आकाराचा आल्याचा तुकडा
२ चमचे तीळ
२ चमचे मीठ

कृती:-
१) खोबरे किसणीवर किसून घ्यावे.
२) कांदे उभे चिरून घ्यावे.
३) लसुण चे गड्डे सोलून घ्यावे.
४) आल स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि एका स्वच्छ रुमालाने पुसुन घ्यावे  मग त्याचे तुकडे करा.
५) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा, कढई गरम झाल्यावर त्यात तीळ टाका आणि चांगले भाजून घ्यावे.
६) तीळ भाजल्यावर कढईतून काढून घ्या आणि त्याच कढई मध्ये खोबरे घालून ते पण चांगले भाजून घ्यावे.
७) खोबरे भाजल्यावर त्यात लसुण आणि आल्याचे तुकडे टाका आणि चांगले भाजून घ्यावे.
८) लसूण आणि आल्याचे तुकडे भाजल्यावर त्यात कांदा घाला आणि कांदा पण चांगला भाजून घ्यावे.
९)आपण भाजलेले तीळ, खोबरे, लसूण, आल, कांदा चांगला थंड करून घ्या.
१०) थंड झाल्यावर एक एक करून मिक्सरला वाटून घ्यावे.
मिक्सरला वाटताना प्रथम तीळ वाटा मग खोबरे नंतर लसूण आणि आल वाटा आणि शेवटी कांदा वाटून घ्या.
११) सगळे घटक वाटून झाल्यावर एक ताठ घ्या आणि त्यात सगळे वाटण एकत्र करून घ्यावे आणि त्यात मीठ घालावे.
१२) सगळे वाटण एकजीव करून हवाबंद डब्यांत साठवून ठेवा.
१३) हे वाटण तुम्ही व्हेज तसेच नॉनव्हेज साठी वापरू शकता.
१४) अश्याप्रकारे आपले वाटण तयार आहे. 


Tags:
Kanda khora che Vatan, Onion - Coconut Masala paste, vatan, कांदा खोबरं वाटण, recipe in marathi, maharashtrian recipes, kandakhobar vatan, वाटण मसाला, goda masala vatan, watan, masala, marathi recipes veg, marathi recipes non veg, indian food dishes, Gavran chicken rassa, village chicken recipe, village chicken curry, Pawsatil Ran Bhajya, Ranbhajya Recipe, gavran bhaji, Ran Bhajya, घाटी मसाला, Khandesh recipe, Ghati Masala, Khandesh, Khandesh Recipe Marathi, Nachni papd flour, नाचणी पापड पीठ, नाचणी पापड, village food cooking, village food, village food recipe, indian food, maharashtrian food, maharashtrian food recipes, अस्सल कोकणी, bhaji recipe, masala recipe in marathi, homemade masala

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने