भरवा मसाला इडली | Stuffed Masala Idli | South Famous Recipe

बटाटा आणि मटर दाणे घालून इडली

या इडल्या खूपच चवदार आणि बनविण्यास सोप्या आहेत.  चटणी, सांभर किंवा कोणत्याही रस्सा भाजी सोबत नाश्त्या सर्व्ह करा.  हिरव्या वाटाणे आणि बटाटा मसाला सह स्वादिष्ट आणि परिपूर्ण नाश्ता रेसिपी खूपच स्वादिष्ट लागते. 
साहित्य :-
इडली बॅटर
२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१०० ग्रॅम मटर दाणे
१ बारीक चिरलेला कांदा
बारीक चिरलेली कोथींबीर
कढीपत्ता
१ चमचा आल लसूण पेस्ट
५-६ हिरव्या मिरच्या ( मिक्सरला वाटून घ्या )
१ चमचा हळद
१ चमचा धना जीरा पावडर
१ चमचा जिरे
१ चमचा मोहरी
हिंग
मीठ ( चवीनुसार )
तेलकृती :-
१) इडली बॅटर घ्या त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्या.
२) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा, कढई गरम झाल्यावर त्यात तेल घाला, तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका.
३) मोहरी तडतडल्यावर त्यात जिरे घाला मग कांदा आणि कढीपत्ता घालून चांगले परतून घ्या.
४) मग त्यात आल - लसूण पेस्ट घाला आणि पुन्हा एकदा हलवून घ्या आता त्यात वाटून घेतलेली हिरवी मिरची, हिंग घाला आणि परतून घ्या.
५) आता त्यात उकडून घेतलेले बटाटे घाला त्याचबरोबर उकडून घेतलेले मटर दाणे , हळद, धना जीरा पावडर घाला आणि भाजी चांगली एकजीव करून घ्यावी. मग त्यात मीठ आणि कोथिंबीर घालून भाजी एकदा हलवून घ्यावी.
६) भाजी वर झाकण ठेवून ५ मिनिटे बारीक गॅस करून भाजी शिजू घ्यावी.
७) ५ मिनिटानंतर भाजी तयार आहे, आता भाजी थंड करून घ्या. भाजी थंड झाल्यावर त्याचे गोल चपटे गोळे बनवून घ्या.
८) इडली पात्राची प्लेट घ्या आणि त्याला तेल लावा त्यावर इडली बॅटर थोडे थोडे घाला मग त्यावर तयार केलेल्या भाजीच्या गोल चपटे गोळे ठेवा आणि वरून परत एकदा थोडे थोडे इडली बॅटर घाला. अश्याच प्रकारे सगळया प्लेट तयार करून घ्या.
९) इडली पात्र घ्या त्यात पाणी आणि लिंबूचे काप टाका आणि त्यावर सगळया प्लेट लावून घ्या.
१०) गॅस चालू करा आणि त्यावर इडली पात्र  मध्यम आचेवर १५ मिनिटे ठेवा.
११) १५ मिनिटानंतर बटाटा मटार दाणे घालून बनवलेली इडली तयार आहे. 


English
Stuffed patato and matar idli

These idlis are super tasty, healthy annd easy to make. Serve these a snack or breakfast with side dish of chutney, Sambhar, or any dip. Delicious and perfect snack recipe filed with  green peas and patato masala.

Ingredients : -
Idli Batter
2 medium sized boiled potatoes
100 gram green peas
1 finely chopped onion
Finely chopped coriander leaves
Curry leaves
1 tablespoon ginger - garlic paste
5-6 Green Chilies (grind in Mixer)
1 tablespoon turmeric
1 tablespoon coriander cumin powder
1 tablespoon cumin seeds
1 tablespoon mustard
Asafoetida
Salt (to taste)
Oil

Method :-
1) Take idli batter, add salt to taste and mix well.
2) Turn on the heat and keep the kadai hot on it, when the kadai is hot add oil to it, when the oil is hot add mustard seeds.
3) After cracking the mustard seeds, add cumin seeds, then add finely chopped onion and curry leaves and saute well.
4) Then add ginger - garlic paste and stir once again. Now add grinded green chillies, asafoetida and fry.
5) Now add boiled potatoes, boiled green peas, turmeric powder, cumin coriander powder and mix well.  Then add salt ( as per taste ) and coriander leaves and stir well.
6) Cover and cook on low heat for 5 minutes.
7) After 5 minutes now stiffing is ready, transfer it to another bowl and let it cool down. Prepare small flatten balls from the sfuffing and place them on a another plate.
8) Take a plate of Idli pot and grease oil on it. Add a little bit of Idli batter on it. Then place the prepared stuffing balls on it and add a little idli batter once again on top. Prepare all the plates in the same way.
9) Take Idli pot, add water and lemon slices and put all the plates on it.
10) Turn on the heat and keep the idli pot on medium heat for 15 minutes.
11) After 15 minutes, idli made by adding potato and green peas is ready.


Tags:
masala wali idli, idli recipe step by step, idli recipe with idli rice, इडली बनाने की रेसिपी हिंदी में, इडली रेसिपी, masala idli recipe, bharwan idli recipe, how to make stuffed idli, masala stuffed idli recipe, idli sandwich recipe, vegetable stuffed idli recipe, how to make soft and spongy idli, school tiffin recipe, idli batter recipe, vegetable idli recipe, stuffed rava idli, rava idli recipe, kids snack recipes, kids recipes, spicy and crispy masala idli, chilli garlic idli recipe, fried idli recipe in tamil, idli manchurian recipe, idli recipe, easy and quick idli fry recipe, how to make masala idli, chilli idli recipe in tamil, crispy fried idli recipe, idli masala recipe, leftover idli recipe

 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने